शिरूर: घोडनदी पात्रात पिकअप उलटली; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
Shirur, Pune | Oct 18, 2025 शिरूर तालुक्यातील चिंचणी-बोरी परिसरात शनिवारी सकाळी घोडनदीच्या पात्रात एक थरारक घटना घडली. प्रवाशांनी भरलेले पिकअप वाहन नदीपात्रातून अरुंद रस्त्याने जात असताना घसरून थेट नदीच्या पात्रात उलटले.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.