वर्धा: गुप्त माहिती आणि तपासामुळे यश! वर्ध्यात स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडीतील २ लाखांचा मुद्देमाल केला जप्त..
Wardha, Wardha | Oct 20, 2025 वर्ध्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. उघडकीस आणला आहे घरफोडीचा गंभीर गुन्हा. सोने व चांदीच्या दागिन्यांसह तब्बल २ लाख ५ हजार ३०३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. असे 20 ऑक्टो रोजी रात्री 11 वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे सविस्तर माहिती अशी की,१६ ऑक्टोबर रोजी समुद्रपूर तालुक्यातील कोरा येथील सौ पार्वता श्रीरामे या शेतमजुरीसाठी गेल्या असता संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराची कडी काढून घरात प्रवेश केल व सोने-चांदीचे दागिने चोरी केले.