दिवाळी सणात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी धुळे पोलीस सज्ज झाले आहेत. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या सूचनेनुसार बाजारपेठा, बसस्थानके, रेल्वे स्थानकांवर पेट्रोलिंग वाढवण्यात आले आहे. घरफोडी, वाहनचोरी, चेन स्नॅचिंग रोखण्यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. सोनार गल्लीतील बॅरिकेडिंग, औद्योगिक वसाहतींचे सुरक्षा ऑडिट आणि संशयितांवर कारवाई सुरू आहे. नागरिकांनी शांततेत सण साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले.