मंगळवेढा: चडचण बँक दरोड्यातील हुलजंती येथून साडेसहा किलो सोने आणि 41 लाख रुपये रक्कम करण्यात आली जप्त
विजयपूरा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चडचण शाखेत दरोडा घालून दरोडेखोर महाराष्ट्रात पळून आले होते. येथे गावकऱ्यांशी झालेल्या झटापटीनंतर त्यांनी टाकलेली लूट पोलिसांनी जप्त केली आहे. चडचण शहरापासून अवघ्या दहा ते पंधरा कि.मी. अंतरावर असलेल्या मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हुलजंती येथे एका पडक्या घराच्या छतावर या दरोड्यातील मुद्देमाल असलेली बॅग पोलीसांना मिळून आली. हुलजंती गावातून ६.५ किलो सोन्याचे दागिने आणि ४१ लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.