अंबरनाथ मध्ये काल 200 ते 250 महिला एका शिंदे गटाच्या उमेदवाराच्या हॉलवर बोगस मतदानासाठी आणण्यात आल्याचा आरोप भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला होता. याची दखल पोलिसांनी घेतली आणि सर्वांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यातील 174 बोगस महिला आढळून आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच जमावबंदी असताना देखील हॉलवर महिलांना ठेवल्या प्रकरणी शिंदेंचे उमेदवार कृष्णा रसाळ यांच्यावर देखील कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.