गोंदिया: बोरा येथे काठीने मारहाण, गंगाझरी पोलीसात गुन्हा दाखल
Gondiya, Gondia | Sep 21, 2025 दि. 19 सप्टेंबर रोजी 7 ते 7:30 वाजेच्या दरम्यान महीला फिर्यादी ही आपल्या घरी स्वयंपाक तयार करत असता यातील आरोपी अशोक केवट याने कोंबड्याच्या जुन्या भांडणावरून महिला फिर्यादीला अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याने फिर्यादी हिने आरोपीला स्वयंपाक खोलीतूनच तू मला अशी शिवीगाळ करू नको आता तुला मी कोंबड्याबद्दल काही बोलली नाही.असे बोलली असता आरोपीने काठीने फिर्यादीला मारहाण करून पुढे पाहून घेण्याची धमकी दिल्याने दि.20 सप्टेंबर रोजी 1 वाजेच्या सुमारास गंगाझरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.