नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या कोलारगाव कोसबी बकी मेंडकी बानटोला या परिसरात गेल्या तीन दिवसांपासून वाघाची दहशत असल्याने परिसरातील नागरिक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे वनपरिक्षेत्र कार्यालय सडक अर्जुनी अंतर्गत येणाऱ्या कोलारगाव कोसबी बकी मेंडकी बानटोला डुग्गीपार कोहमारा या परिसरात कधी दिवसा तर कधी रात्री वाघाचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांची शेतीचे काम थांबले आहेत त्यामुळे वनविभागाने लक्ष देऊन वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे