पाथर्डी: मोहटादेवी गडाच्या पायथ्याची अतिक्रमणे हटवली. नवरात्रीच्या पार्श्वभूमिवर कारवाई
सोमवारी सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहटा देवी गडाच्या पायथ्याशी वाहतुकीस अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तामध्ये पंचायत समिती, बांधकाम विभाग आणि देवस्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हटवण्यात आली आहेत. तणावपूर्ण वातावरणामध्ये ही मोहीम यशस्वी झाली आहे. यावेळी पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.