नेवासा: शिंगणापूरला "ते" दर्शन बंद ; भाविकांची गर्दी घटली !
शनिशिंगणापूर देवस्थानने रात्री साडेदहा ते पहाटे चार वाजेपर्यंत दर्शन बंद केले असल्याने भाविकांची संख्या घटली आहे. हा निर्णय देवस्थानच्या सुरक्षेच्या दृष्टीने शनिशिंगणापूर तत्कालीन देवस्थान विश्वस्त मंडळाने घेतला होता. रात्रीचे दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे केवळ रात्रीचेच नव्हे तर दिवसभरात येणाऱ्या भाविकांची संख्याही घटली आहे.