महाराष्ट्र शासनाने मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या सुगंधी तंबाखूच्या साठवणुकीवर आणि विक्रीवर बंदी घातली असतानाही, छुप्या मार्गाने साठा करणाऱ्या एका आरोपीवर लाखनी पोलिसांनी धाडसी कारवाई केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, अन्न सुरक्षा अधिकारी किरण रंगस्वामी गेडाम यांच्या पथकाने ९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास लाखनी येथील रहिवासी जाहीद आझाद हुसेन सैय्यद (वय ५२) यांच्या घरावर छापा टाकला. या झडती दरम्यान घराच्या मागील स्वयंपाक खोलीत विविध कंपन्यांचा एकूण ४४,०४५/- रु