विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी तसेच कर्मचार्यांना वाशिम येथे विविध शासकीय कार्यालयात कामासाठी जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे मानोरा ते वाशिम बस सेवा तात्काळ सुरु करण्याची मागणी भाजपा महिला मोर्चा मानोरा तालुकाध्यक्ष सिमा राठोड यांनी राज्य परिवहन महामंडळ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केल्याची माहिती दि. 27 नोव्हेंबर रोजी दिली आहे.