सण-उत्सव, सुट्या किंवा पर्यटनानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. मात्र, याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी आपला मोर्चा बंद घरांकडे वळवला आहे. जिल्ह्यात सन २०२५ मध्ये घरफोडीच्या तब्बल ४६३ घटना घडल्या आहेत. सोशल मीडियावर स्टेटस ठेवून बाहेरगावी जाणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.