समुद्रपूर: आत्मा अंतर्गत हरित क्रांतीचे जनक डॉ. स्वामिनाथन यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने गिरड येथे प्रगतीशील शेतकऱ्यांचा सत्कार
समुद्रपुर:भारताचे कृषी शास्त्रज्ञ हरित क्रांतीचे जनक भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने गिरड येथील मगन संग्रहालय गिरड कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला उद्घाटक उपविभागीय कृषी अधिकारी स्वप्नील तोरणे यांचे हस्ते दिप प्रज्वलन करून फोटोचे पूजन करण्यात आले.प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी समुद्रपूर आर. पी. धनविज यांनी केले.उपविभागीय कृषी अधिकारी स्वप्नील तोरणे यांनी एम. एस. स्वामिनाथन यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या कार्याबाबत मार्गदर्शन केले.