साकोली: वडद येथे भीम स्मृती मंडळातर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
साकोली तालुक्यातील वडद येथे भीम स्मृती मंडळातर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मंगळवार दि 14 ऑक्टोबर सायंकाळी6ते रात्री10 या वेळात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या सोबतच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह रँलीचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला सरपंचा भारती बडवाईक, उपसरपंच दीपक कळस्कर ग्राम पंचायत समिती सदस्य शालू नगरीकर, जयदेवजी कापगते,गिरीधारी बडवाईक,झाशीराम शेंडे सोविंदराव हटकर व अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.संचालन खुशाल नंदेश्वर व आभार श्री.राऊत यांनी मानले