जालना: जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील सहावा आरोपी अटकेत,जालना आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई...
Jalna, Jalna | Nov 4, 2025 जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील सहावा आरोपी अटकेत,जालना आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई... आरोपीला अकोला जिल्ह्यातून करण्यात आली अटक. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आज दिनांक चार मंगळवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील सहाव्या आरोपीला पोलिसांनी अटक केलीय. जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.