राहाता: शिर्डी नगराध्यक्ष पदासाठी सुप्रिया गायकवाड चर्चेत... !
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी मुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय.. उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वी उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची चाचपणी सुरु झालीये.. अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत शिर्डी नगरपरिषदेची निवडणूक अत्यंत महत्वाची मानली जातेय.जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे शिर्डी नगरपरिषदेवर वर्चस्व कायम आहे.