देवळी: सालफळ घाटातून रेतीची चोरी! ₹ ७.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त; ट्रॅक्टर मालक-चालकावर गुन्हा दाखल
Deoli, Wardha | Oct 16, 2025 वर्धा नदीतील सालफळ घाटातून चोरटी रेती वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत पोलिसांनी तब्बल ७ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.यात महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर (₹ ६ लाख), एक जुनी ट्रॉली (₹ १.५० लाख) आणि अंदाजे १०० फूट रेती (₹ ६ हजार) यांचा समावेश आहे.दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात ट्रॅक्टर चालक दिनेश देहारे आणि ट्रॅक्टर मालक सचिन बनकर यांचा समावेश आहे. असे आज 16 ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे