सेलू: केळझर येथे मुलाकडून आईला जीवे मारण्याची धमकी; सेलू पोलिसांत तक्रार दाखल
Seloo, Wardha | Oct 19, 2025 दारू पिऊन आलेल्या मुलाने आईशी वाद घालून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना ता. 19 रविवारी तालुक्यातील केळझर येथे सकाळी 9 वाजता घडली. याप्रकरणी सौ. सुनीता प्रफुल्ल कंगाले वय 37 रा. केळझर यांनी पवन कंगाले याचे विरुद्ध सकाळी 10.45 वाजता तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती सेलू पोलिसांनी दिली.