कवठा/डोंगरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी सदिच्छा भेट दिली. हा सप्ताह भक्ति, ज्ञान आणि वैराग्याचा अद्भुत संगम होता. ग्रामस्थांच्या उत्साहाने आणि श्रद्धेने भरलेल्या या कार्यक्रमात हजारो भाविकांनी सहभाग घेतला होता.व्यासपीठावरून कथा वाचक महाराजांनी श्रीकृष्ण लीला, भगवान विष्णूंच्या अवतारांच्या कथा आणि भागवताच्या गहन तत्त्वज्ञानाचे रसाळ वर्णन केले. अशा धार्मिक आयोजनांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण