कोपरगाव: आमदार आशुतोष काळे यांच्या गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी काकासाहेब कोयटे यांच्या नावाची घोषणा जाहीर
कोपरगाव नगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीकरिता आमदार आशुतोष काळे गटाकडून आज 13 नोव्हेंबर रोजी कृष्णाई मंगल कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून काकासाहेब कोयटे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.या.याप्रसंगी काकासाहेब कोयटे व माजी नगरसेवक जनार्दन कदम यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश देऊन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.