नागपूर जिल्ह्यातील खापा वनपरिक्षेत्रात दुर्दैवी घटना घडली आहे. पेढरी शेतशिवारात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महिलेवर रानडुकराने अचानक हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव रेशमा विकेश धुर्वे (वय 27 वर्षे) असे असून ती शेतात कापूस वेचण्याचे काम करत होती. त्याच वेळी रानडुकराने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आणि घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला.