धामोडी येथील २३ वर्षीय विवाहिता आपल्या एक वर्षीय बालकाला घेऊन घराबाहेर गेली आणि बेपत्ता झाले. सदर महिला 13 जुलै रोजी दुपारी बारा वाजता एक वर्षीय बालकाला घेवून घराबाहेर बाहेर गेली होती कोणाला काहीं न सांगता गेलेली ही विवाहिता नंतर घरी परतलेलीच नाही तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला परंतु विवाहित आणि बालक हे कुठेच मिळून आल्याने निंभोरा पोलीस ठाण्यामध्ये रविवार दिनांक 14 जुलै रात्री 11:33 मिनिटाला हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.