उमरखेड: जि.प. व पंचायत समिती निवडणूक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
यवतमाळ जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गटनिहाय व गणनिहाय प्रारूप मतदार यादी संबंधित ग्रामपंचायत, पंचायत समिती व तहसील कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून, सर्व इच्छुक मतदारांनी यादी पाहून आपली नोंद तपासावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.