खमारी भागात ३० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी मोटारसायकल व चारचाकी वाहन यांच्यात झालेल्या धडकेत १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. आझाद नित्यप्रकाश वासनिक (१७) रा. खमारी असे मृताचे नाव आहे. तर प्रणय दीपक उके (१७) रा. खमारी असे जखमीचे नाव आहे. ते दोघेही मोटारसायकल एम.एच.३५ ए. ९४४८ ला चालवीत गोंदियाकडून खमारीकडे जात असताना, खमारी येथील माहेश्वरी साल्वेंटसमोर चारचाकी वाहन एम.एच ०१ बी.के. ११८५ च्या चालकाने वाहन हलगर्