तिरखुरी येथील नागरिकांच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा या उद्देशाने, १५ व्या वित्त आयोग योजने अंतर्गत पंचायत समिती सदस्य सौ. निवृताबाई सुकरे यांच्या स्थानिक निधीतून मौजा तिरखुरी येथे नवनिर्मित 'आरो प्लांट'चे लोकार्पण १ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या सोहळ्याचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य सौ. निवृताबाई सुकरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्री चंद्रशेखर खेडीकर होते