गोंदिया: बीकेएमयु. महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन ची देवरी येथे सभा संपन्न
बी के एम यु. महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन देवरी तालुक्याची सभा दि.6 नोव्हेंबरला देवरी येथे काॅ शंकर बिजलेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली.यावेळी काॅ हौसलाल रहांगडाले राज्य उपाध्यक्ष,काॅ शेखर कनोजिया जिल्हा अध्यक्ष काॅ परेश दुरूगवार यांनी मार्गदर्शन केले. वनहक्क जमीनीचे पट्टे,मनरेगा,आवास योजना, वृद्धापकाळ पेन्शन योजना,आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी काॅ हौसलाल रहांगडाले राज्य उपाध्यक्ष यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.