वैजापूर: प्रशासनाने येवला नाका परिसरात अतिक्रमणे काढली
वैजापूर शहरातील येवला रोडवरील येवला नाका परिसरात प्रशासनाकडून अतिक्रमण काढण्यात आले.सोमवारी दुपारी उपविभागीय अधिकारी हे ऍक्शन मोडवर दिसून आले दुपारी अचानक उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड यांनी पोलिसांच्या फौजफाट्यासह शहरातील येवला नाका परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या अतिक्रमणावर कारवाई केली.जेसीबीच्या सहायाने ही अतिक्रमणे काढण्यात आली.दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.