धुळे: बायोमेट्रिक माहिती संकलनात धुळे पोलीस राज्यात चौथ्या स्थानी; पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची माहिती.
Dhule, Dhule | Nov 11, 2025 धुळे जिल्हा पोलीस दलाने गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू केला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या माहितीनुसार, अटक आरोपींची बायोमेट्रिक माहिती संकलनात धुळे जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. ‘मेजरमेंट कलेक्शन युनिट’मार्फत ५४६ पैकी २४० आरोपींची माहिती गोळा करण्यात आली आहे. या डिजिटल डेटामुळे गुन्हेगारांचा माग काढणे सुलभ होऊन तपास प्रक्रियेला गती मिळणार आहे.