नेवासा तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले कुकडी कारखान्याच्या विरोधातील उपोषण लेखी आश्वासनानंतर स्थगित
#newasa
कुकडी कारखान्याने २०२३-२४ गळीत हंगामात नेवासा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २२०० रुपयाप्रमाणे पेमेंट दिले होते. तर इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २८०० रुपयाप्रमाणे पेमेंट वर्ग केले होते. त्यामुळे कुकडी कारखान्याकडून थकीत रक्कम मिळावी, या मागणीसाठी ऊस उत्पादक संजय नागोडे, मच्छिंद्र गवळी यांनी नेवासा तहसील कार्यालय समोर उपोषण सुरु केले होते.