औंढा नागनाथ: उपनगराध्यक्ष मनोज देशमुख यांच्या उपस्थितीत शहरातील गंधकूटी तलावची साफसफाई, शहर सौंदर्यात पडणार भर
औंढा नागनाथ येथील गंधकुटी तलाव काठावर वाढलेली झाडे झुडपे व तलावात वाढत गेलेल्या वेलीने तलावात स्वच्छता निर्माण होत असल्याने औंढा नागनाथ शहराचे उपनगराध्यक्ष मनोज देशमुख यांच्या उपस्थितीत दिनांक 27 नोव्हेंबर गुरुवार रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान तलाव काठावरील वाढलेली झुडपे व वेली तोडून या भागात साफसफाई यावेळी नागेश गोरे सह इतरांची उपस्थिती होती तलाव स्वच्छतेने या भागातील सौंदर्यात आणखी भर पडणार असून साफसफाई नंतर सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचे उपनगराध्यक्ष मनोज देशमुख यांनी सांगितले