पुणे शहर: पुण्याच्या येरवडा परिसरात कोयता गँगचा राडा, घरात घूसून दाम्पत्याला मारहाण
येरवडा परिसरात दाम्पत्यावर तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. किरकोळ कारणावरुन एका तरुणाने थेट घरात घुसून दाम्पत्यांवर तलवारीने हल्ला केली.फिर्यादीच्या घरासमोर येऊन रात्री झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ करत हल्ला केला.