नाशिकरोड पोलिसांनी सुभाष रोडवरील बिंद्रा मार्केट शेजारी मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकत ‘अंदर-बहार’ जुगार खेळताना चौघांना पकडले. या कारवाईत एकूण २,४०० रुपये रोख रक्कम व बावन्न पत्त्यांचा कॅट जप्त करण्यात आला. याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहवा पाटील करीत आहेत. घटना १६ डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वासहा वाजता घडली.