अकोला: गुरू तेग बहादूर शहिदी समागमासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल भवनात घेतला तयारीचा आढावा
Akola, Akola | Dec 1, 2025 गुरू तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त ७ डिसेंबरला नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेत महसूल भवनात आढावा बैठक झाली. अकोल्यातून शेकडो भाविक नागपुरात जाणार असल्याने आवश्यक सुविधा, वाहतूक, प्रचार, रॅली आणि विविध उपक्रमांच्या नियोजनाचे निर्देश त्यांनी दिले. समिती सदस्य व समाजप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशी म