चिखली: राष्ट्रीय लोककलावंत संघर्ष समितीची बेमुदत आमरण उपोषण आढावा बैठक दे माळी येथे संपन्न
राष्ट्रीय लोक कलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समितीची बेमुदत अमरून उपोषणाची आढावा बैठक देऊळगाव माळी येथे संपन्न झाली. दे. fr माळी येथील सर्वच क्षेत्रातील उपेक्षित कलावंत या बैठकीसाठी उपस्थित होते. या सर्वांनीच या संघर्ष समितीच्या संघर्षाला जाहीर पाठिंबा दिला. संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष संदीप कुमार बोरकर हे दिनांक 27 ऑक्टोंबर पासून मेहकर पंचायत समिती समोर लोककलावंतांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषण करणार आहे.