सेलू: केळझर येथे गणपती मंदिर परिसरातील गणेशकुंडात आढळला तरुणीचा मृतदेह; आत्महत्येची शक्यता
Seloo, Wardha | Nov 7, 2025 तालुक्यातील केळझर येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसरातील गणेशकुंड विहिरीत आज (७ नोव्हेंबर) दुपारी सुमारे १२.३० वाजता एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणीची ओळख साक्षी खुशाल देहारे (वय २० वर्षे, रा. सिंदी मेघे वर्धा) अशी झाली आहे. साक्षी वर्ध्यातील एका कॅफेमध्ये काम करत होती, अशी माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली. फिर्यादीवरून पोलिसांनी दुपारी २ वाजता अकास्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.