नांदुरा: नगराध्यक्ष पदासाठी भाग्यश्री रामभाऊ झांबरे यांच्यासाठी पक्षाकडे उमेदवारी मागणार –ह.भ.प.रामभाऊ महाराज झांबरे
आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी नांदुरा नगर परिषद खुला महिला नगर अध्यक्ष पदासाठी राखीव असून यासाठी कायद्याचे शिक्षण घेतलेली. भाग्यश्री रामभाऊ झांबरे ही अतिशय योग्य उमेदवार असून नगर अध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडी करून भाजपा शहर अध्यक्ष कडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. अशी माहिती आध्यात्मिक आघाडी ह भ प रामभाऊ महाराज झांबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.