उत्तर सोलापूर: मुरारजी पेठ येथे घराची भिंत पाडण्यावरून मारहाण ; दोघांवर गुन्हा
घराची भिंत पाडण्यावरून लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध तब्बल ४ वर्षानंतर (३ सप्टेंबर २०२४) फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अप्पासाहेब चांगदेव राऊत (वय-४६,रा.मनोरमा कॉम्प्लेक्स,मुरारजी पेठ) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाणे फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब सुखदेव बुरगुटे (वय-५०) व ऋतुराज बुरगुटे (रा.फस्ट फेज,अवंती नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.