दिग्रस: बातमीची दखल, दिग्रसच्या स्वातंत्र्यसैनिक स्मारक परिसराची अभियंता, नगरसेवकाकडून पाहणी; लवकर काम सुरू करण्याचे आश्वासन
दिग्रस शहरातील कमानगेट परिसरातील स्वातंत्र्यसैनिक स्मारकाच्या दयनीय अवस्थेबाबत काल प्रसिद्ध झालेल्या बातमीची अखेर नगरपरिषद प्रशासनाने दखल घेतली आहे. आज दि. ८ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान संबंधित ठिकाणी नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता अक्षय राठोड, नगरसेवक केटी जाधव तसेच स्थानिक गावकरी यांनी स्वातंत्र्यसैनिक स्मारक परिसर व त्याजवळील स्वच्छालयाची पाहणी केली. यावेळी परिसरातील उखडलेले टाईल्स, अस्वच्छता व अर्धवट सोडलेली कामे प्रत्यक्ष पहिले.