बुलढाणा: फडणवीसांच्या राज्यात कायदा-सुव्यवस्था सत्ताधाऱ्यांच्या सेवेसाठीच उरली आहे का - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. ट्रक हेल्परचं अपहरण होतं, तरीही सत्तेच्या दबावामुळे खेडेकर कुटुंबीयांना कायद्याची सूट मिळते. हे कसले रामराज्य ? फडणवीसांच्या राज्यात कायदा-सुव्यवस्था फक्त सत्ताधाऱ्यांच्या सेवेसाठीच उरली आहे का? मग आता सामान्य जनतेने न्याय मिळवायचा तरी कसा? हाच प्रश्न आता महाराष्ट्राला पडला आहे.असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले आहे.