शिंदखेडा: शिव पेट्रोल पंपाजवळ ट्रॅक्टर व रिक्षाचा भिषण अपघातात एकाचा मृत्यू अज्ञात चालकाविरुद्ध नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल.
नरडाणा गावाजवळील शिव पेट्रोल पंपाजवळ ट्रॅक्टर रिक्षाच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू. सुरेश दिलीप कोळी वय 63 यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आम्ही नरडाणा गावाकडे रिक्षा मधून जात असताना समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचे नाव माहित नाही सदर ट्रॅक्टर चालक याने.रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत वाहन चालवत असताना त्यांनी आमच्या रिक्षाला जोरदार धडक दिली यात एकाचा मृत्यू होऊन मला गंभीर दुखापत झाली यावरून अज्ञात चालकाविरुद्ध नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.