चंद्रपूर: गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र चंद्रपूर येथे स्थापन करण्यासाठी तब्बल 414 कोटींचा प्रस्ताव सादर
चंद्रपूर राज्याचे माझी वने व सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरानंतर चंद्रपूर येथे गोंडवाना विद्यापीठ यांचे उपकेंद्र स्थापन करण्यासाठी तब्बल 414 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मान्यता देत पुढील कारवाईसाठी सकारात्मक आश्वासन दिले हा प्रस्ताव लवकरच मंत्री मंडळासमोर मंजूर साठी ठेवण्यात येणार असल्याचे मत 15 सप्टेंबर रोज सोमवारला व्यक्त केले.