पारोळा |येथील लोकदर्पण पत्रकार असोसिएशनच्या गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या सभागृहाच्या मागणीला अखेर न्याय मिळाला आहे. आमदार अमोल पाटील यांच्या ठोस आश्वासन व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पत्रकार संघाच्या सभागृह बांधकामासाठी २० लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून, आज या सभागृहाच्या कामाचे भव्य भूमिपूजन आमदार अमोल पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले.