धुळे तालुक्यातील वडजाई, सौंदाणे आणि बाभुळवाडी गावातील ग्रामस्थांनी रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात अनोखे आंदोलन केले. खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्याबद्दल ग्रामस्थांनी आजी-माजी लोकप्रतिनिधींचे “सुंदर रस्त्यासाठी आभार” असे व्यंगात्मक बॅनर लावून निषेध व्यक्त केला. रस्त्याची निविदा मंजूर होऊन वर्ष उलटले तरी काम सुरू न झाल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. आता या आंदोलनानंतर कारवाई होते का, याकडे लक्ष लागले आहे.