जामखेड: आगीत भस्म झालेल्या नुकसानग्रस्त कुटुंबाना किराणा, कपडे आणि संसारपयोगी साहित्याची भेट..!
येथील स्वामी समर्थ नगर परिसरात गुरुवारी अज्ञात कारणाने लागलेल्या भीषण आगीत पुठ्ठा बनविण्याचा कारखाना आणि त्या लगतची तीन घरे भस्मसात झाली. या आगीत संसारोपयोगी वस्तूंसह सुमारे दीड लाख रुपये रोख जळून खाक झाले. ऐन दिवाळीत तीन कुटुंबांना याची झळ बसल्याच्या कारणाने कर्जत तलाठी महसुल संघटनेच्यावतीने तीन कुटुंबाना किराणा, भांडी आणि नवीन कपडे तहसीलदार गुरू बिराजदार यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. या अचानक मिळालेल्या भेटीने कुटुंब देखील भारावले गेले.