मोहाडी: कांद्री येथे दोन चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक, आरोपी वाहन चालकाविरुद्ध आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल
कांद्री येथे चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक झाल्याची घटना दि. 25 नोव्हेंबर रोज मंगळवारला रात्री 10 वा.च्या सुमारास घडली. यातील फिर्यादी गोविंद अग्रवाल हे आपल्या चारचाकी वाहनाने नागपूरकडून तुमसरकडे येत असताना समोरून येणाऱ्या चारचाकी वाहन क्र.MH 36 20BA 3790 च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून फिर्यादीच्या वाहनाला समोरासमोर धडक दिली. यात अग्रवाल यांच्या वाहनाचे अंदाजे 90 हजार रुपयांचे नुकसान झाले याप्रकरणी आरोपी वाहन चालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.