सेलू: पोहायला गेलेल्या 14 वर्षीय बालकाचा बोर नदीत बुडून मृत्यू; सुकळी (स्टेशन) येथे घडली घटना
Seloo, Wardha | Sep 28, 2025 पोहायला गेलेल्या बालकाचा बोर नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना ता. 28 रविवारला दुपारी 1 वाजताचे दरम्यान मौजा सुकळी स्टेशन शिवारात उघडकीस आली. शौर्य निलेश टेंभरे वय 14 वर्ष रा. सुकळी स्टेशन असे मृतकाचे नाव आहे. सहा तासाच्या प्रयत्नानंतर मृतकाला पाण्याबाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी सेलू पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.