मेहकर: दे.माळी येथे दीपावलीच्या पावन पर्वावर नाचू गाऊ कीर्तनाच्या रंगी कार्यक्रमाचे आयोजन
दीपावलीच्या पावन पर्वावर प्रकाश भाऊ मित्र मंडळ व युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जिल्हाप्रमुख प्रकाश भाऊ डोंगरे यांच्या वतीने देऊळगाव माळी तालुका मेहकर येथे 22 ऑक्टोंबर रोजी आवाजाचे जादूगार हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांचा सायंकाळी आठ वाजता पांडुरंग संस्थानची खुले रंग मंदिर त्यासमोर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी नाचू गाऊ कीर्तनाच्या रंगी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन प्रकाश डोंगरे युवा सेना जिल्हाप्रमुख यांनी केले आहे.