संगमनेर: संगमनेर येथील तरुणाला मारहाण करून पुलावरून फेकले खाली
संगमनेर येथील तरुणाला मारहाण करून पुलावरून फेकले खाली संगमनेर : कापड दुकानात कामाला असलेल्या तरुणाला चार-पाच जणांनी मारहाण केली, त्याच्याकडील पाच हजार रुपये, गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतली. त्याला नदीवरील लहान पुलावरून खाली फेकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी तीनच्या सुमारास रात्री संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत म्हाळुंगी नदी परिसरात घडली.