धुळे: फागणे येथील 'रास्ता रोको' आंदोलन मागे; रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात, रस्त्याची आणि पुलाची अधिकाऱ्यांसोबत पाहणी
Dhule, Dhule | Sep 17, 2025 फागणे गावातील अनवर नाल्यापासून मुक्ती गावापर्यंतच्या दुरवस्थेतील रस्त्याच्या कामाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरुवात केली असून त्यामुळे फागणे संघर्ष समितीने पुकारलेले रास्ता रोको आंदोलन मागे घेतले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रस्ता व अनवर नाल्यावरील पुलाच्या दयनीय अवस्थेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. प्रशासनाने प्रत्यक्ष काम सुरू केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले, अशी माहिती समितीचे पदाधिकारी व सरपंच चौधरी यांनी दिली.