वाई: भुईंज च्या महालक्ष्मी मंदिरात किरणोत्सव भाविकांना पहाटे चे आरती दर्शनाची पर्वणी
Wai, Satara | Sep 25, 2025 आज गुरुवारी सकाळी सहा वाजता भुईंज येथील, देवी महालक्ष्मी चे उत्सवमूर्ती वर सूर्यकिरणांनी अभिषेक घातला, आणि हा सोहळा अनुभवनाऱ्या भाविक भक्तांनी, एकच जयजयकार केला,नवरात्र उत्सवाच्या चौथ्या माळेत देवी च्या शिरावर व कपाळी या सूर्यकिरणांनी जेव्हा स्पर्श केला, त्यावेळी चैतन्य आणि श्रध्दा यांचा संगम अनुभवयास मिळाला,कृष्णा नदीच्या प्राचीन घाटावर असलेल्या अतिभव्य अखंड पाषाणातील असलेले हे भुईंज चे महालक्ष्मी देवीचे मंदिर, आजही वास्तू विशारद व शिल्पकार यांना संशोधनाचा विषय ठरत आहे.